Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीवाड्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वाडा : वाडा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने सर्वच ग्रामपंचायतींचे कामकाज बंद झाले आहे. या आंदोलनामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आदी सहभागी झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाने मात्र नागरिकांची गैरसोय होणार आहे.

वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पद एकत्र करून पंचायत विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक संघटनेला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, रोजगार सेवकांना १५००० फिक्स मानधन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, विनाकारण कामावरून काढलेल्या रोजगार सेवकांना परत कामावर घेणे आदी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पंकज चौधरी यांनी यावेळी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -