Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणया चि-याच्या खाणी आणि विना नंबरप्लेट गाड्या कुणाच्या?

या चि-याच्या खाणी आणि विना नंबरप्लेट गाड्या कुणाच्या?

टॅक्स चुकवून विना नंबरप्लेट गाड्यातून होते चिऱ्यांची वाहतूक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध विभागात मोठ्या प्रमाणात आरटीओचा टॅक्स चुकवून विना नंबरप्लेट गाड्यातून खुलेआम चिऱ्याची वाहतूक केली जात असून याकडे वाहतूक पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्याचा तोटा सरकारला होत असून मोठ्या प्रमाणात टॅक्स चुकविला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्स चुकवून विविध प्रकारची वाहतूक केली जात आहे. तसेच कोकणामध्ये मिळणारा जांभा चिरा आणि त्याची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपर तसेच ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचा म्हणजेच आरटीओचा टॅक्स न भरताच काही वाहने बिना नंबर प्लेट गाड्या भरधाव वेगाने हाकत असून त्याचा त्रास जनतेला होत आहे.

तसेच विविध शहरामधून असणाऱ्या वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक गाड्या विनानंबर प्लेट गाड्यातून चिऱ्याची वाहतूक करत असून गाडीच्या पुढेही नंबर नाही आणि मागेही नाही. मात्र अशा गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडुन कोणतीच कारवाई केली जात नाही.

पोलिसांच्या समक्ष बिनधास्तपणे हे चालक वाहने चालवत असून भरधाव वेगाने जाणाऱ्या या चिरे वाहतुकीमुळे अनेकवेळा अपघाताचा धोका निर्माण होतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या नवीन वाहतूक निरीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्हा हा एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले असुन विनानंबर प्लेट गाड्यांमुळे हा विषय चर्चेला आला आहे. तसेच आमदार लिहिलेल्या गाड्यांवरही नंबर प्लेट नसल्यामुळे आणि त्यावर पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचे पुढे आले आहे.

सर्वसामान्यांसाठी दंडाचे हत्यार उपसले जात असताना गडगंज असणाऱ्या चिरे वाहतूक आणि अन्य वाहनांवरती का कारवाई केली जात नाही. याकडे कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी होणारी ही नंबर प्लेट शिवाय गाड्यांची वाहतूक सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -