Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीRobot Wedding : अजब गजब! तरुण चक्क रोबोटसोबत बांधणार लग्नगाठ

Robot Wedding : अजब गजब! तरुण चक्क रोबोटसोबत बांधणार लग्नगाठ

जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच. आतापर्यंत आपण दोन सजीव व्यक्तींमध्ये लग्न होत आल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र राजस्थानमधील एक व्यक्ती चक्क रोबोटसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची अजब गजब माहिती उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर येते राहणारा इंजिनियर सूर्य प्रकाश समोटा हे एका रोबोटशी लग्न करणार आहेत. रोबोट्सची आवड असलेल्या सूर्य प्रकाश आता रोबोटच्या प्रेमात पडले असून, ते आता ‘गीगा’ या नावाच्या रोबोटसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

सूर्य प्रकाश यांचे मन रोबोटमध्ये गुंतलं होतं. कुटुंबाने त्याची रोबोट्सची आवड पाहून आयटी क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. यानंतर सूर्य प्रकाश यांनी अजमेरच्या शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते रोबोटिक्समध्ये रुजू झाले. या काळात त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. तर आता ते एका रोबोटसोबत सर्व विधी, परंपरेनुसार लग्न करणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यही त्यात सहभागी होणार आहेत, असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.

रोबोट तयार करायला १९ लाख रुपये खर्च

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गीगा’ हा रोबोट तयार करण्यासाठी सुमारे १९ लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारचं लग्न करण्यास कुटुंबियांचा नकार होता. पण, आता त्यांना मी तयार केलं आहे. या रोबोटची निर्मिती तामिळनाडूमध्ये केली जात आहे, तर त्याचे प्रोग्रामिंग दिल्लीत केले जात आहे. ‘लहानपणापासून मला रोबोट्समध्ये खूप रस होता. मात्र, मी सैन्यात भरती व्हावं असं माझ्या कुटुंबियांना वाटत होतं. त्यानंतर मी सैन्यात भरती होण्याची तयारी केली आणि नौदलातही निवड झाली’असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.

रोबोट करणार ‘ही’ कामं

सूर्य प्रकाश यांनी सांगितलं की, “जेव्हा हा सर्व प्रकार मी आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्काच बसला, पण नंतर घरच्यांना समजावलं. ‘गीगा’च्या संपूर्ण प्रोग्रामिंगसाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च येणार असून, हा प्रोग्रामिंग इंग्रजीमध्ये असणार आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा हिंदी प्रोग्रामिंग देखील जोडलं जाऊ शकतं. तसेच, ‘गीगा’ आठ तास काम करू शकते, ज्यामध्ये पाणी आणणे, हॅलो म्हणणे, पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखी कामं तो रोबोट करणार आहे.”

दरम्यान, सूर्य प्रकाश यांनी सुमारे चारशे रोबोटिक्स प्रकल्पांवर काम केले आहे. कोरोनाच्या काळात जयपूरच्या सवाईमान सिंह रुग्णालयात रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना औषधे आणि अन्न दिलं जात होतं. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या काळात टचलेस मतदान यंत्राचं मॉडेलही तयार केलं होतं. आता सूर्य प्रकाश हे इस्रायली सैन्यासोबत काम करणार आहेत आणि लवकरच ते इस्रायलला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -