Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीMalegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी विरोधात वॉरंट जारी

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी विरोधात वॉरंट जारी

एनआयए कोर्टाने जारी केले जामीनपात्र वॉरंट

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण २००८ची (Malegaon Bomb Blast Case) सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) आरोपी क्रमांक १० सुधाकर धर द्विवेदी (Sudhakar Dwivedi) उर्फ दयानंद पांडे याच्या विरोधात १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी केले आहे. पुढील सुनावणीत हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने नुकतेच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

सुनावणीवेळी सुधाकर द्विवेदी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत १० हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्याऐवजी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने एनआयएला २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी देखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -