Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकरवाढ नसलेला ठामपाचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नसलेला ठामपाचा अर्थसंकल्प सादर

  • दायित्वाची झळ बसल्याने जुने प्रकल्प रेटण्याकडे भर
  • यंदाच्या बजेटवर मुख्यमंत्र्यांची छाप
  • मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना

ठाणे (प्रतिनिधी) : यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्ण छाप असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत अनेक योजना, प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. त्यानुसार कोणतीही करवाढ व दरवाढ नसणार, काटकसरीचा, आर्थिक शिस्तीचा २०२३-२४ चा ४३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सादर केला.

या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, प्रसूती माता, खड्डेमुक्त रस्ते, शून्य कचरा मोहीम, तलावांचे सौंदर्यीकरण, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे आदी महत्वाच्या योजनांचा यात समावेश करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय यंदाच्या अर्थसंकल्पावर २७४२ कोटींच्या दायित्वाची झळ बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देताना कोणत्याही नव्या खर्चीक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले नसल्याचेच दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ मध्ये ३३८४ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र काही विभागांच्या उत्पन्नात घट येत असल्याने महसुली उत्पन्न ३०२१ कोटी ५१ लाखाऐवजी २७८५ कोटी ४५ लाखांचा अर्थसंकल्प सुधारीत करण्यात आला आहे. सुधारीत अर्थसंकल्पात अनुदानापोटी ५७९ कोटी ८१ लाख अपेक्षित धरण्यात आले असून ५१२ कोटी ३५ लाखांचा अनुदान पालिकेला प्राप्त झाले आहे.

महापलिका उत्पन्नाचे स्त्रोत

  • मालमत्ता कर – मालमत्ताकरापोटी २०२३ मध्ये मालमत्ता करापोटी ७६१ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच मालमत्तांचा आता जीआएस सर्व्हे केला जाणार आहे.
  • विकास व तत्सम शुल्क – शहर विकास विभागाकडून ५८२ कोटी ४२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात प्रिमियमच्या सवलतीमुळे त्यावर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार यंदा ५६५ कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
  • शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम मिळत असून आतापर्यंत ९७९ कोटी ४४ लाख प्राप्त झाले. परंतु मुंद्राक शुल्क अधिभारापोटी १०८ कोटी ६३ लाखांचे अनुदान प्र्राप्त झाले आहेत. त्यानुसार यंदा १२६७ कोटी ७९ लाख उत्पन्न अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान

यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्या अनुषंगानेच महापालिकेने शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून जे काही प्रकल्प हाती घेतले आहेत.

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना –

महापालिका हद्दीत दरवर्षी ३६ हजार गरोदर मातांची नोंदणी होत असते. त्यातील १० हजार प्रसूती महापालिकेत होतात. त्यानुसार गर्भवती महिलांच्या नोंदी १२ आठवड्यांत करणे, तसेच प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव, कमी वजनाचे बाळ, आदी समस्या उद्भवतात. याच आनुषंगाने ही योजना हाती घेण्यात आली आहे.

पार्कींग प्लाझा येथे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, माझी आरोग्य सखी अंतर्गत सर्व वयोगटातील महिलांना हेल्थ पॅकेज दिले जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सीबीएसई शाळा सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -