Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024RCB vs GT: डुप्लेसीचं अर्धशतक गुजरातसाठी ठरलं घातक, बंगळुरुचा दमदार विजय...

RCB vs GT: डुप्लेसीचं अर्धशतक गुजरातसाठी ठरलं घातक, बंगळुरुचा दमदार विजय…

RCB vs GT: बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिला. त्याने ऋद्धिमान सहाला बाद केले. सिराजच्या चौथ्या षटकात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल दोन धावा करून बाद झाला. मात्र, राहुल तेवतियाच्या २१ चेंडूत ३५ धावा, शाहरुख खानच्या २४ चेंडूत ३७ धावा, डेव्हिड मिलरच्या २० चेंडूत ३० धावा आणि रशीद खानच्या १४ चेंडूत १८ धावांच्या उपयुक्त खेळीने गुजरातला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. गुजरातची सुरुवात खूपच खराब झाल्याने डाव १४७ धावांत आटोपला.

गुजरातने आरसीबीला विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य दिले. सलामीसाठी आलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आक्रमक खेळी करत ५.५ षटकांत ९२ धावांची सलामी दिली. कोहलीने ४ षटकार आणि २ चौकारांसह २७ चेंडूत ४२ धावा केल्या. तर डु प्लेसिसने १० चौकार आणि ३ षटकार मारत अवघ्या २३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली.

सलामीच्या भागीदारीनंतर आरसीबीच्या डावाला गळती लागली. आरसीबीने अवघ्या २५ धावांतच ६ विकेट गमावल्या. यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी नाबाद ३५ धावा जोडल्या आणि आरसीबीला विजय मिळवून दिला.आरसीबीचा ११ सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला. दुसरीकडे, टायटन्सचा हा तब्बल सामन्यांमधील सातवा पराभव ठरला. या विजयामुळे आरसीबी संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -