Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीSAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील 'या' मोठ्या कंपनीत काम...

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भारतातील एका मोठ्या कंपनीत काम करण्याची नामी संधी मिळाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या स्टील बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एका कंपनीने एक दोन नव्हे तर चक्क १०८ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या रिक्त जागा बोकारो स्टील प्लांट आणि झारखंड ग्रुप ऑफ माईन्समध्ये कार्यकारी आणि नॉन-एक्झेक्युटिव्ह पदांसाठी असणार आहेत.

‘या’ तारखेआधीच करा अर्ज

कंपनीत रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना SAIL च्या या अधिकृत वेबसाइट https://www.SAIL.co.in/en/home ला भेट देऊन ७ मे पूर्वीच अर्ज करावा लागणार आहे.

पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या अधिकृत अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील. सर्व पदांसाठी पात्रता निकष वेबसाइटवर उपलब्ध अधिकृत अधिसूचनेवर तपासले जाऊ शकतात.

एकूण भरती संख्या

कंपनीत सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (OHS), सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) आणि इतर पदांशी संबंधित १०८ रिक्त जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. तसेच उमेदवाराने जमा केलेली फी परत केली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

  • कार्यकारी पदासाठी पदांची संख्या – २७
  • अकार्यकारी पदासाठी पदांची संख्या – ८१

अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

  • नोंदणीसाठी आणि भविष्यातील सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर त्यांची निवड होईपर्यंत त्यांच्याकडे ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
  • ऑनलाइन अर्जाशी संबंधित एसएमएस-आधारित सूचना प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे कार्यरत मोबाइल क्रमांक देखील असले पाहिजे.
  • भरती प्रक्रिया संपेपर्यंत आणि त्यानंतर त्यांची निवड होईपर्यंत त्यांच्याकडे प्रवेशपत्र किंवा कॉल लेटर इत्यादी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे कार्यक्षम इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रणाली देखील असावी.
  • उमेदवाराकडे अलीकडेच स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (जेपीजी स्वरूपात) असावा.
  • उमेदवारांकडे त्यांच्या स्कॅन केलेल्या स्वाक्षरीची एक प्रत (JPG मध्ये) असावी.
  • त्यांच्याकडे ऑनलाइन पेमेंट सुविधा देखील उपलब्ध असायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -