Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिककोलाजश्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर

श्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर

श्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. श्री वैष्णव धर्माच्या दक्षिण भारतीय परंपरेत, देवता नारायण ही सर्वोच्च देवता म्हणून आणि त्यांची पत्नी लक्ष्मी ही सर्वोच्च देवी म्हणून पूजली जाते. लक्ष्मीला मोक्षाचे स्त्रोत, नारायण मानले जाते आणि म्हणून देवापर्यंत पोहोचण्यासाठी अनुयायांकडून आदर केला जातो.

कोकणी बाणा – सतीश पाटणक

श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका तालुक्याचे ठिकाण असून कोकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते. बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते.

या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णू मूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते.

श्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. श्री वैष्णव धर्माच्या दक्षिण भारतीय परंपरेत, देवता नारायण ही सर्वोच्च देवता म्हणून आणि त्यांची पत्नी लक्ष्मी ही सर्वोच्च देवी म्हणून पूजली जाते. लक्ष्मीला मोक्षाचे स्त्रोत, नारायण मानले जाते आणि म्हणून देवापर्यंत पोहोचण्यासाठी अनुयायांकडून आदर केला जातो. पुराणांत नारायण या शब्दाने जाणला जाणारा जो परमेश्वर हाच सत्य-ज्ञानादी वाक्यप्रतिपादित तत्त्व आहे. तीच सर्वोत्कृष्ट ज्योती आहे. नारायणच परमात्मा आहे. नारायणच परब्रह्मतत्त्व आहे. नारायणच सर्वोत्कृष्ट आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णू मूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी. दगडाच्या झिलईमुळे ती चकचकीत दिसते. अतिशय रेखीव प्रमाणबद्ध असलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णूवाहन गरूड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे.

याशिवाय जय-विजयही दोन्ही बाजूंस उभे आहेत. प्रभावळीवर कीर्तिमुखाच्या दोन्ही बाजूंस दशावतार कोरलेले आहेत. विष्णू मूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्म, चक्र, गदा, शंख) ही मूर्ती श्रीधराची ठरते; परंतु सोबत लक्ष्मी असल्यामुळे कदाचित लक्ष्मीनारायण संबोधले जात असावे. गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम, मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम, आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराकडून दुसऱ्या चौकोनी वाशावर एक काष्ठलेख नजरेस पडतो. देवनागरी लिपीतील हा मजकूर आपल्याला सहज वाचता येतो.

यावरून २९ मार्च १७७५ या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे समजते. मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर आजही पेशवे घराण्यातील रोजच्या प्रार्थनेत म्हटला जाणारा श्लोक आहे. मंदिराच्या समोरच छोट्या घुमटीत गरूड मूर्ती आहे, तर शेजारी मारुती मंदिर आहे. (लेखक मुख्यमंत्र्यांचे
माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -