Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सPrathmesh Parab : प्रथमेश झालाय डिलिव्हरी बॉय

Prathmesh Parab : प्रथमेश झालाय डिलिव्हरी बॉय

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

एका सामान्य कुटुंबात जन्मलेला, कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसलेला; परंतु हळूहळू आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब होय. प्रथमेशचं गाव मसुरा मालवण. जन्म मुंबईचा, बालपण मुंबईत गेलं. महानगरपालिकेच्या व अंधेरीच्या परांजपे शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण विलेपार्लेच्या डहाणूकर महाविद्यालयातून झाले. वाणिज्य शाखेतील बी.बी.आयचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. महाविद्यालयात त्याने मराठी नाट्य मंडळात भाग घेतला. दोन वर्षे त्याने बॅक स्टेजला काम केले. महाविद्यालयात असताना ‘बालक-पालक’ ही एकांकिका त्याने केली होती. ती एकांकिका दिग्दर्शक रवी जाधवने पाहिली व त्या चित्रपटासाठी त्याची ऑडिशन घेतली. त्या चित्रपटाने घवघवीत यश मिळवलं.

त्यानंतर त्याला ‘टाइमपास’ चित्रपट मिळाला. एका सामान्य दिग्दर्शकाने टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. त्या चित्रपटातील त्याची दगडू व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिग्दर्शक रवी जाधवकडून व सहकलाकारांकडून भरपूर गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. तो चित्रपट त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्याने दृश्यम हा हिंदी चित्रपट केला. त्यानंतर ‘झिपऱ्या’, ‘टकाटक’ हे चित्रपट केले. सिंगल चित्रपट करताना राम खाटमोडे व विनोद वणवे यांनी त्याला एका चित्रपटाची कथा ऐकवली, त्या चित्रपटाचे नाव होते. ‘डिलिव्हरी बॉय’ सरोगसी हा महत्त्वाचा विषय या चित्रपटामध्ये मांडला गेला आहे. दिगंबर कानतोडे नावाची व्यक्तिरेखा त्याने या चित्रपटामध्ये साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याचा संवाद आहे. दिगंबर कानतोडे हात पण तोडतो अन् पाय पण तोडतो. यामध्ये त्याची प्रॉपर्टी एजंटची भूमिका आहे. त्याच्या विभागामध्ये दुसऱ्या एजंटने केलेले काम त्याला आवडत नाही. यामध्ये दोन गाणी आहेत. प्रेक्षक या चित्रपटाचे कसे स्वागत करतील, हे लवकरच कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -