Tuesday, April 30, 2024
Homeदेशमुंबई हल्ल्याचा मास्टरमाईड दाऊद इब्राहिमला दिले विष? सोशल मीडियावर दावा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईड दाऊद इब्राहिमला दिले विष? सोशल मीडियावर दावा

नवी दिल्ली: मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत(dawood) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. त्याच्याबद्दल असा दावा केला जात आहे की दाऊदला कराचीमध्ये विष देण्यात आले आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून दावा केला जात आहे की दाऊद इब्राहिमला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असा दावा केला जातोय की एका अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. यामुळेच दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विष दिल्या गेल्याच्या बातमीला अद्याप कोणाकडूनही दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, असेही सांगितले जात आहे की मुंबई पोलीस अधिकारी दाऊदचे जवळच्या नातेवाईकांकडूनही याबाबतची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाकिस्तानी मीडियाने दिला सोशल मीडियाचा हवाला

जिओ टीव्ही न्यूजने सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा हवाला देताना सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अफवा सुरू आहे. यात दाऊदची स्थिती गंभीर असल्याने त्याला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचे कारण विष दिल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानात सोशल मीडिया सर्व्हर डाऊन

याबाबतच पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमीनेही यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबाबतचा विषय होता. याबाबतच्या घटनेबाबत बोलताना सांगितले की पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काम करत नाहीयेत. यूट्यूब, गुगल आदि सर्व्हर डाऊन आहेत.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड

१९९३मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल ब्लास्टचा मास्टरमाईंड तो होता. स्फोट घडवून आणल्यानंतर तो दुबईला पळून गेला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात राहत आहे. तेथे तो कुटुंबियांसोबत राहत आहे. त्याच्याविरोधात भारतात दहशतवादी हल्ला, हत्या, अपहरण, सुपारी हत्या, संगठित अपराध, ड्रग्सत, हत्यांरांची तस्करी अशी अनेक प्रकरणे आहेत. २००३मध्ये त्याला जागतिक दहशतवाही म्हणून घोषित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -