Friday, May 10, 2024
Homeदेशओमायक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय

ओमायक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय

ओमायक्रॉन जगातील ९१ देशांमध्ये पसरला

नवी दिल्ली : ओमायक्रॉन (Omicron variant) हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटला (Delta variant) मागे टाकण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल यांनी कोरोनाच्या सध्यस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली. यामुळे अनावश्यक प्रवास, मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी जाणीवपूर्वक टाळण्याची हीच वेळ असून सण-समारंभ साजरे करताना याबाबतची काळजी घेणे फार महत्वाचे असल्याचे मत आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले.

ओमायक्रॉनमुळे एकीकडे जगाची चिंता वाढलेली असताना नीती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल यांनी म्हटलंय की, युरोपमध्ये कोरोना रोगाचा एक नवीन टप्पा अनुभवायला मिळतो आहे. तसेच या ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, दक्षिण आफ्रिकेतील डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन हा अधिक वेगाने पसरतोय. ज्याठिकाणी डेल्टाचं संक्रमण कमी आहे, त्याठिकाणी ओमायक्रॉनची चलती दिसून येत आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनचे रुग्ण जगातील ९१ देशांमध्ये नोंदवले गेले आहेत. यांनी म्हटले आहे की, सध्या भारतातील ११ राज्यांमध्ये १०१ ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. गेल्या २० दिवसांपासून दररोज दहा हजारच्या खाली नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या १ आठवड्यातील संक्रमणाचा दर हा ०.६५ टक्के होता. सध्या, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये केरळचा वाटा ४०.३१ टक्के आहे.

दरम्यान, भारत देश जगात सर्वाधिक दराने कोरोना लसीचे डोस देत आहे आणि दररोज दिल्या जाणाऱ्या डोसचा दर यूएसएमध्ये दिल्या जाणाऱ्या डोसच्या ४.८ पट आणि यूकेमध्ये दिल्या जाणाऱ्या डोसच्या दराच्या १२.५ पट आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -