Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीबापरे! गुजरातमध्ये सापडल्या २ हजाराच्या २५ कोटी बनावट नोटा!

बापरे! गुजरातमध्ये सापडल्या २ हजाराच्या २५ कोटी बनावट नोटा!

‘रिझर्व्ह बॅंक’ ऐवजी ‘रिव्हर्स बॅंक’ छापलेल्या २ हजाराच्या नोटांचे सहा कार्टन जप्त

सुरत : गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना खोट्या नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खब-यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही करवाई केली. या नोटांचे मुल्य २५ कोटी ८० लाख रुपये इतके आहे.

गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोयसर यांनी या कारवाईसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मुंबई- अहमदनगर मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणा-या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवले आणि तपासणी केली असता त्यांना रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या आढळून आल्या.

रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या सहा कार्टनमधील १ हजार २९० पाकिटांमध्ये २ हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे मुल्य २५ कोटी ८० लाख इतके असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या नोटांवर रिझर्व्ह बॅंकेऐवजी रिव्हर्स बॅंक असे छापण्यात आले होते.

बॅंकेच्या अधिका-यांकडे आणि फॉरेन्सिक टीमकडे या नोटा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -