Wednesday, June 26, 2024
Homeनिवडणूक २०२४Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत...

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास

पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून त्यातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह पालघरचाही समावेश आहे. काल पालघरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत आदित्यनाथ यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल मोठे विधान करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

आदित्यनाथ म्हणाले, जो आमच्यावर हल्ले करतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील त्यांच्यावर प्रतिहल्ला करू. काँग्रेसच्यावेळी पाकिस्तानातून हल्ले केले जात होते. काँग्रेसला प्रश्न विचारल्यावर ते सांगायचे की दहशतवादी सीमापार आहेत. असं सांगून कसं चालेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हे चित्र बदलले आणि आता पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणंही पाकिस्तानला कठीण जात आहे. तुम्ही नरेंद्र मोदींना तिस-यांदा पंतप्रधान करा, पुढच्या ६ महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग झाल्याचे तुम्हाला दिसेल. हे करण्यासाठी हिंमत लागते. धाडस असेल तरच हे काम करता येते. मोदी हे काम नक्की करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्यावर नजर रोखून पाहिल्यास आम्ही गप्प राहणार नाही. न घाबरता, न थांबता आणि खचून न जाता विकासाच्या प्रवासात वाटचाल करणारा हा नवा भारत आहे आणि याचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. असा नव्या प्रकारचा भारत तुम्हा सर्वांसमोर येत आहे, असेही योगी म्हणाले.

त्याचबरोबर मुघल सम्राट औरंगजेबच्या आत्म्याने विरोधी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना योग्य जागा दाखवली जाईल. भाजपा केवळ सत्तेसाठी नाही तर विकसित भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत यात शंका नसावी असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -