Monday, May 6, 2024
HomeदेशLok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यासाठी आज संपणार प्रचार, ८८ जागांवर २६...

Lok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यासाठी आज संपणार प्रचार, ८८ जागांवर २६ एप्रिलला मतदान

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचे(voting) काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आज संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपेल. यानंतर २६ एप्रिलला १३ राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीर केले जातील. मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे.

दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानासाठी नाव मागे घेण्याची तारीख गेल्याने एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणत्या जागांवर मतदान

त्रिपुरा: त्रिपुरा पूर्व

जम्मू-काश्मीर: जम्मू लोकसभा

पश्चिम बंगाल: दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट

आसाम: दर्रांग-उदालगुरी, डिफू, करीमगंज, सिलचर आणि नौगांव

बिहार: किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपुर आणि बांका

छत्तीसगढ़: राजनांदगांव, महासमुंद आणि कांकेर

मध्य प्रदेश: टीकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रीवा आणि होशंगाबाद

महाराष्ट्र: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी

उत्तर प्रदेश: अमरोहा, मेरठ, बागपत, गाजियाबाद, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड आणि मथुरा

राजस्थान: टोंक-सवाई माधोपुर, अजमेर, पाली, जोधपुर, बाड़मेर, जालोर, उदयपुर, बांसवाडा, चित्तौडगढ, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बारा

कर्नाटक: उडुपी-चिकमगळूर, हासन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकुर, मांड्या, मैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू उत्तर, बंगळुरू केंद्रीय, बंगळुरु दक्षिण,चिकबल्लापुर आणि कोलार

केरल: कासरगोड, कन्नूर, वडकरा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड़, अलाथुर, त्रिशूर, चलाकुडी, एर्णाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मवेलिक्कारा, पथानमथिट्टा, कोल्लम, अट्टिंगल आणि तिरुअनंतपुरम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -