Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीGoogle Chrome : सावधान! गुगल क्रोम युजर्सना सरकारचा अलर्ट; होऊ शकते मोठे...

Google Chrome : सावधान! गुगल क्रोम युजर्सना सरकारचा अलर्ट; होऊ शकते मोठे नुकसान!

लवकरच करा ‘हे’ अपडेट

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाचे आयुष्य इंटरनेटवर आधारित आहे. कधीही कोणतीही माहिती हवी असल्यास गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र आता गुगल क्रोमबाबत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या एजन्सी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमद्वारे (CERT-In) युजर्ससाठी एक नवीन इशारा जारी केला आहे. यामध्ये गुगल क्रोममध्ये असलेल्या अनेक त्रुटींची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल क्रोम ब्राउझरमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोन, टॅबलेट आणि कॉम्प्युटरमध्ये घुसू शकतात. हॅकर्स गुगल क्रोमच्या त्रुटींचा वापर करुन त्यांच्या पद्धतीने अनियंत्रीत कोड तयार करु शकतात. हॅकर्स गुगल क्रोमच्या या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमच्या महत्त्वाच्या डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात, असे सरकारने अहवालात म्हटले आहे. तसेच तुमच्या बँक खात्याशी संबंधित डेटा ऍक्सेस करून आणि लॉग इन करून आर्थिक नुकसान देखील होऊ शकते, असे सांगितले आहे.

जारी केलेल्या चेतावणी अंतर्गत, त्याचा प्रभाव Windows आणि Mac साठी 124.0.6357.78/.79 पेक्षा पूर्वीच्या Google Chrome आवृत्तीवर आणि Linux साठी 124.0.6367.78 पूर्वीच्या Chrome आवृत्तीवर दिसून येतो. अशा परिस्थितीत, ही समस्या टाळण्यासाठी, Google Chrome युजर्ना, Google Chrome त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हॅकर्सकडून होणारा धोका टाळण्यासाठी तुमचा Chrome ब्राउझर अपडेट ठेवा.

असे ठेवा तुमचे गुगल क्रोम सुरक्षित :

  • सर्व प्रथम Google Chrome उघडा.
  • वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
  • मेनूमधून मदत निवडा.
  • आता सबमेनूमधून Google Chrome बद्दल निवडा.
  • यानंतर गुगल क्रोम आपोआप अपडेट तपासेल, जर काही अपडेट असेल तर अपडेट सुरू होईल.
  • अपडेट पूर्ण झाल्यानंतर, Google Chrome ची नवीन आवृत्ती पुन्हा लाँच करा.
  • तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम वापरत असाल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -