Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKokan Railway: कोकण चाकरमान्यांसाठी खुशखबर! प्रवासाची धावपळ थांबणार

Kokan Railway: कोकण चाकरमान्यांसाठी खुशखबर! प्रवासाची धावपळ थांबणार

उन्हाळी हंगामात अतिरिक्त ट्रेन धावणार

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी पडताच अनेक जण आपल्या गावी किंवा बाहेर फिरायला जातात. लाखो प्रवाशांचा धुमाकुळ तसेच गाड्यांची अतिरिक्त गर्दी पाहून यावेळी कोकण रेल्वेने (Kokan Railway) उन्हाळी हंगामात (Summer season) विविध मार्गांवर विशेष गाड्या (special trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेलचेल दिसून येत आहे. अशातच उन्हाळ्यात चाकरमान्यांची धावपळ होऊ शकते. यामुळे नियोजित मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रवाशांची हैराणी थांबवण्यासाठी कोकण रेल्वेकडून ७ एप्रिल ते ६ जून या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन – मंगळुरु जंक्शन (09057) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. उधना जंक्शन – मंगळुरु जंक्शन (09057) ही गाडी ७ एप्रिल ते ५ जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री ८ वाजता सुटणार. तर, दुसऱ्या दिवशी सांयकाळी ७ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन (09058) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी ८ एप्रिल ते ६ जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालवली जाणार आहे.

उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर थांबेल. ही गाडी एकूण २३ डब्यांची असून त्यात तीन वातानुकूलित कोच असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -