Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीArun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका!

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका!

नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : गँगस्टर (Gangster) अरुण गवळी (Arun Gawli) यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या (Nagpur bench order) वतीने देण्यात आले आहेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्याबाबत याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे आदेश दिले आहेत.

नागपूर खंडपीठात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आता सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

१० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याचा आधार घेत अरुण गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आता सुनावणी पार पडली आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी अरुण गवळी यांना दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ते सध्या नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -