Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024 Points Table: पंजाबची पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप, दिल्ली-हैदराबादचे हाल

IPL 2024 Points Table: पंजाबची पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप, दिल्ली-हैदराबादचे हाल

मुंबई: आयपीएल २०२४च्या दुसऱ्याच सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवले. तर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. पंजाब आण कोलकाता यांच्या विजयानंतर पॉईंट्सटेबलमध्ये बदल झाला आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स सध्या टॉपवर आहे.

चेन्नईने हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीला हरवले होते. सीएसके, पंजाब आणि कोलकाता यांच्याकडे २-२ पॉईंट्स आहेत. सीएसके पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यांच्याकडे २ पॉईंट्स आहेत. सोबतच त्यांचा रनरेट+ ०.७९९ इतका आहे. पंजाब दुसऱ्या स्थानावर आहेत. पंजाबचे २ गुण आहे आणि नेट रनरेट + ०.४५५ इतका आहे. कोलकाताकडेही दोन पॉईंट्स आहेत. आणि त्यांचा रनरेट + ०.२०० इतका आहे. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. दिल्ली ९व्या स्थानावर आहे आणि हैदराबाद ८व्या स्थानावर आहे. या तिघांचा रनरेट मायनसमध्ये आहे.

आयपीएल २०२४चा पुढील सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जाईल. हा सामना रविवारी जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानंतर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला जाईल.

शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना २०८ धावा केल्या. या दरम्यान फिल साल्टने अर्धशतक ठोकले. त्याने ४० बॉलचा सामना करताना ५४ धावा केल्या. साल्टने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. आंद्रे रसेलने २५ बॉलचा सामना करताना ६४ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -