Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीGrammy Awards 2024 : ग्रॅमी पुरस्कारांमध्ये भारतीय संगीतकारांचा डंका! शंकर महादेवन, झाकीर...

Grammy Awards 2024 : ग्रॅमी पुरस्कारांमध्ये भारतीय संगीतकारांचा डंका! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी मारली बाजी

पुरस्कार सोहळ्यात झाकीर हुसैन यांनी सादरीकरणही केले

लॉस एंजेलिस : यंदा लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार २०२४ (Grammy Awards 2024) चे आयोजन करण्यात आले होते. संगीत उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. यात भारतीय संगीतकारांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांच्यासह चार संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.

संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट (Shankar Mahadevan from Shakti) अल्बमचा यंदाच्या ग्रॅमी २०२४ मध्ये गौरव करण्यात आला. तसेच झाकीर हुसैन यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी त्यांच्या पाश्तो (Pashto) नावाच्या अल्बमला गौरविण्यात आले. त्यात बेला फ्लेक, एडगर मेयर आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचा समावेश होता. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये झाकीर हुसैन यांनी सादरीकरणही केले.

‘अॅज वी स्पिक’ (As we speak) या अल्बमसाठी देखील झाकीर हुसैन आणि राकेश चौरासिया यांना गौरविण्यात आले. अशा प्रकारे यंदा तीन ग्रॅमी मिळाले असून राकेश चौरासिया यांना देखील दोन ग्रॅमीनं गौरविण्यात आले आहे. भारतीय संगीतकारांनी विख्यात अशा ग्रॅमी पुरस्कारावर आपल्या देशाची मोहोर उमटविल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -