Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs AUS: गुगलवरही वर्ल्डकपचा फिव्हर, बनवले खास डूडल

IND vs AUS: गुगलवरही वर्ल्डकपचा फिव्हर, बनवले खास डूडल

अहमदाबाद: भारताच्या यजमानपदाखाली गुजरातच्या अहमदाबादमध्ये नरेद्र मोदी स्टेडियमध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाच्या(world cup final) फायनलचा फिव्हर सगळ्यांवर दिसत आहे. गुगलवरही हा फिव्हर चढलेला दिसतोय. आज या विश्वचषकातील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. वि्श्वचषकातील या सामन्यासाठी गुगलने खास डूडल(doodle) बनवले आहे.

डूडलमध्ये काय आहे खास?

गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून खास मेसेज दिला आहे. यात गुगलच्या दुसऱ्या oला वर्ल्डकपचे रूप देण्यात आले आहे. तर बाकी लेटर्सना खेळाडूंच्या रँकिंगप्रमाणे सजवण्यात आले आहे. गुगलचा L आहे त्याला बॅटचे रूप देण्यात आले आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये स्टेडियम आणि विकेटसोबत खेळाचा नजारा दिसत आहे.

गुगलने भारत-ऑस्ट्रेलियाला दिल्या शुभेच्छा

गुगलने आपल्या डूडलमध्ये म्हटले की आज डूडल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२३ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा जल्लोष साजरा करत आहे. गुगलने पुढे म्हटले, या वर्षी भारताने अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नेदरलँड्, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसह दहा देशांची राष्ट्रीय यजमानपद राखले. आता ही स्पर्धा अंतिम सामन्यावर आली आहे. अंतिम संघांना शुभेच्छा.

५ ऑक्टोबरपासून सुरू झाला होता विश्वचषक

भारताच्या यजमानपदाखाली वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून झाली होती. त्या दिवशीही गुगलने डूडल बनवत याचा जल्लोष साजरा केला होता. १० संघातील ही स्पर्धा खूपच रोमहर्षक झाली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाचा पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला होता आणि शेवटचा सामना याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -