Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाMitchell Marsh : ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीबद्दल मिचेल म्हणतो, मी पुन्हा तेच...

Mitchell Marsh : ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीबद्दल मिचेल म्हणतो, मी पुन्हा तेच करणार!

पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार?

मुंबई : क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारताचा (India) पराभव करत ऑस्ट्रेलियाने (Australia) दणदणीत विजय मिळवला. यानंतर विजयी संघाने जल्लोष करत त्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. मात्र, यातील मिचेल मार्श (Mitchell Marsh) या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूचा एक फोटो प्रचंड वादग्रस्त ठरला. या फोटोत तो विश्वचषकावर पाय ठेवून हातात बिअरची बाटली घेऊन बसला होता. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना त्याचा भयंकर राग आला होता. भारतीय खेळाडूंनीही या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या घटनेला ११ दिवस उलटून गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मिचेलने या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेन रेडिओ नेटवर्कशी बोलताना त्याने सांगितले की, “साहजिकच त्या चित्रात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मी याबद्दल फारसा विचार केला नाही. मी सोशल मीडियावर फारसे पाहिले नाही. होय, हे प्रकरण चिघळलं. जो भेटतो तो हेच सांगतो की प्रकरण खूप तापलं आहे. मात्र, आता त्यावरची चर्चा थांबली आहे. असं जरी असलं तरी त्या चित्रात वादग्रस्त असं काहीही नव्हतं.”

ऑस्ट्रेलियन सेन रेडिओ नेटवर्कवर निवेदकाने त्याला पुढे प्रश्न विचारला की, “ती कृती तू पुन्हा करशील का? त्यावर मार्श म्हणाला, “होय, मी पुन्हा तसेच करेन. मला नक्कीच आशा आहे की, सर्व क्रिकेट चाहते मला समजून घेतील. मी प्रामाणिकपणे सांगतो कारण, त्यात अपमानास्पद काहीही नव्हते. मी त्याचा तसा फारसा विचार केला नाही. मी फारसे सोशल मीडियाकडे पाहिलेही नाही. त्यात मला वाईट असं काहीही वाटत नव्हतं”, असं मत मिचेलने व्यक्त केलं आहे. मिचेलच्या या उद्दामपणावर क्रिकेटप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील ३ सामने झाले असून भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सामना जिंकला. आज म्हणजेच १ डिसेंबरला या टी-२० मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे बरेचसे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत कारण ते पुन्हा मायदेशी परतले आहेत. कांगारू संघ उर्वरित दोन सामन्यांमध्ये नव्या खेळाडूंसह उतरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -