Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीगव्हाच्या किंमती १२ वर्षांमध्ये दुप्पट

गव्हाच्या किंमती १२ वर्षांमध्ये दुप्पट

गव्हाचे उत्पादन घसरले, मुंबईत गव्हाच्या पिठाचा दर सर्वाधिक

रशिया-युक्रेन युद्ध, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम

मुंबई (प्रतिनिधी) : देशातल्या गव्हाच्या किमती गेल्या १२ वर्षांमध्ये दुप्पट झाल्या आहेत. जानेवारी २०१० मध्ये गव्हाच्या पिठाच्या किमती प्रतिकिलो १७ ते १८ रुपये होत्या. या एप्रिल महिन्यात किंमती प्रतिकिलो तब्बल ३२.३८ रुपयांवर पोहोचल्या आहेत. पिठाच्या किमतीत झालेली ही प्रचंड वाढ सामान्य ग्राहकांच्या मुळावर आली आहे. गव्हाचे उत्पादन आणि साठा घसरल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्नधान्य आणि पुरवठा विभागानेच या दरवाढीवर प्रकाश टाकला आहे. शनिवारी गव्हाच्या पिठाचे दर ३२.७८ रुपये प्रतिकिलो झाले. गेल्या वर्षीच्या ३०.०३ रुपये प्रतिकिलो या भावापेक्षा ते ९.१५ टक्क्यांनी जास्त असल्याचे खात्याने स्पष्ट केले. विभागाच्या मते, १५६ केंद्रांचा आढावा घेतला असता पोर्ट ब्लेअर इथे सर्वाधिक जास्त ५९ रुपये प्रतिकिलो तर पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया इथे सर्वात नीचांकी २२ रुपये प्रतिकिलो भावाने गव्हाचे पीठ मिळाले. देशातल्या चार प्रमुख शहरांमध्ये गव्हाच्या पिठाचे दर कमी जास्त आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक किंमत आहे. मुंबईत गव्हाच्या पिठाचे दर प्रति किलो ४९ रुपये इतके आहे. त्याखालोखाल चेन्नईत ३४ रुपये प्रतिकिलो तर कोलकातामध्ये गव्हाच्या पिठासाठी प्रतिकिलो २९ रुपये आणि दिल्लीत सर्वात कमी २७ रुपये प्रति किलो दर आढळले.

या वर्षाच्या सुरुवातीपासून पिठाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. १ जानेवारीपासून आतापर्यंत या दरात ५.८१ टक्के दरवृद्धी झाली आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात उच्चांकी पातळी गाठण्यात आली. एप्रिल महिन्यात गव्हाच्या पिठाचे दर सर्वात उच्चांकी पातळीवर गेल्याचे दोन वर्षांमध्ये समोर येत आहे. सर्वच क्षेत्रातल्या महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरवण्यात येत आहे. गव्हाच्या पिठाच्या दरवाढीचे खापरही या दोन देशांच्या संघर्षावर फोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे या युद्धामुळे डिझेलचे दर वाढले असून वाहतूक खर्चात झालेली वाढ गव्हाच्या आणि पिठाच्या किंमतीवर परिणाम करत आहे.

घाऊक महागाई वाढल्याने सर्वसामान्य जगण्यासाठी धडपड करत आहे. सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारलाही महागाई रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. २०१७ मध्ये पहिल्यांदा गव्हाच्या पिठाच्या किंमतीत ७.६२ टक्क्यांची वाढ झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा हा विक्रमही मागे पडला. यंदा गव्हाच्या पिठाच्या किंमतीत ७.६२ टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली. गव्हाच्या पिठाच्या दर वृद्धीचा परिणाम बेकरी पदार्थांवरही दिसून आला आहे. बिस्किटांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर बेकरी पदार्थांच्या किंमतीत ही वाढ दिसून आली. महागाईची झळ सकाळच्या नास्त्यावर दिसून आला. मार्च महिन्यात बेकरी ब्रेडच्या किंमतीत ८.३९ टक्क्यांची वृद्धी दिसून आली. २०१५ नंतरची ही उच्चांकी वाढ असल्याचं आकडेवारीवरुन समोर येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -