Thursday, May 9, 2024
Homeदेशगुजरात एटीएसने जप्त केले ३५० कोटींचे ड्रग्ज

गुजरात एटीएसने जप्त केले ३५० कोटींचे ड्रग्ज

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर केली कारवाई

अहमदाबाद (हिं.स.) : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून ३५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जहाजाच्या माध्यमातून हे अंमलीपदार्थ भारतात आणण्यात आले होते. यापूर्वी सीमा सुरक्षा दलाने चार पाकिस्तानी मच्छिमारांना अटक करत गुजरातच्या किना-या जवळून १० मासेमारी नौका जप्त केल्या होत्या. त्यानंतर आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एटीएसने मंगळवारी जप्त केलेल्या जहाजामधून प्रामुख्याने हेरॉईन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याची बाजारपेठेतील किंमत ३५० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये, मुंद्रा बंदरावर देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी कारवाई करत २१ हजार कोटी किमतीची ३ हजार किलो ड्रग्सची खेप जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून २ हजार कोटींहून अधिक किमतीचे ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात, नऊ पाकिस्तानी नागरिकांना गुजरात एटीएसने, भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत २८० कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -