Thursday, May 9, 2024
Homeमहत्वाची बातमीबंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी राज्यपालांचे पोलीस महासंचालकांना पत्र

बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी राज्यपालांचे पोलीस महासंचालकांना पत्र

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. यामध्येच सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.

यामध्ये सर्व आमदारांना सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याशिवाय आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांच्या घरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -