Wednesday, May 1, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सकन्फर्म तिकिटांच्या नावावर फसवणूक

कन्फर्म तिकिटांच्या नावावर फसवणूक

गोलमाल – महेश पांचाळ

जस्ट डायलवर सूचिबद्ध असलेल्या एका रेल्वे एजंटने एका स्वयंसेवी संस्थेशी संलग्न असलेल्या महिलेला १८ तिकिटे उपलब्ध करून दिली खरी. परंतु, त्या महिला प्रवास करताना सर्व तिकीट बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारदार भाषा सिंह यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्या रेल्वे एजंटचा शोध सुरू ठेवला आहे.

आरबीआय क्वार्टरमध्ये राहणाऱ्या आणि एनजीओ चालवणाऱ्या भाषा सिंह या त्यांच्या टीमसोबत एका प्रोजेक्टसाठी गुवाहाटीला जाणार होत्या. त्यांनी अगोदर प्रतीक्षायादीवरील (वेटिंग) तिकीट काढण्यात आली होती. प्रवासाच्या चार दिवस आधी तिकीट कन्फर्म झाली का? याबाबत आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिकीट तपासले तेव्हा त्यात कोणतेही कन्फर्म केलेले तिकीट उपलब्ध नसल्याची माहिती कळली होती. त्यामुळे तक्रारदार सिंह यांनी रेल्वे एजंटची मदत घ्यायचे ठरविले. रेल्वे एजंटच्या संपर्कासाठी जस्ट डायलवर कॉल केला. त्यावेळी तो फोन अबू अली नावाच्या एजंटशी जोडला गेला. कन्फर्म तिकिटांचे आश्वासन देऊन, अबू अलीनेनंतर तक्रारदार भाषा सिंह यांना सर्व १८ तिकिटे जारी करून कन्फर्म झाल्याची माहिती दिली. तसेच अबू अलीने व्हॉट्सॲपवरून लोकमान्य टिळक टर्मिनस ते आगरतळा एक्स्प्रेसचे (ट्रेन क्र. १२५१९) तिकीटही पाठवले. विशेष म्हणजे पीएनआरवर ऑनलाइन पद्धतीने सर्व तिकिटे ही कन्फर्म (जागा आरक्षित) दाखवित होती. सर्व तिकिटे कन्फर्म झाल्याची खात्री पटल्यामुळे भाषा सिंग यांनी तिच्या खात्यातून एजंट अबूला ७२ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. ७ एप्रिलची प्रवासाची तारीख होती. भाषा सिंह आणि इतर सहकारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवास सुरू करण्यासाठी सीटवर जाऊन बसले. त्यावेळी याच सीट क्रमांकाचे दुसरे प्रवासी तेथे आले. त्यांच्याकडेही भाषा सिंह आणि सहकाऱ्यांकडे असलेल्या सीटचा पीएनआर क्रमांकाची तिकिटे होती.

काही काळ एक्स्प्रेसमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे तिकीट तपासनीस (टीसी) यांना हस्तक्षेप करावा लागला. टीसीने दोघांकडील तिकिटे तपासली असता तक्रारदार भाषा सिंह आणि तिच्या सहकाऱ्यांची तिकिटे बनावट असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, भाषा सिंह यांनी एजंट अबू अलीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे टीसीने तक्रारदाराला सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. याबाबत वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ७२ हजार रुपये गमावले त्याचे दु:ख असताना, आरक्षित तिकीट हाती नसल्याने गुवाहाटीचा दौरा रद्द करण्याची वेळ भाषा सिंह यांच्यावर आली.

टीप : गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना पाहता, कोणावर विश्वास ठेवावा, हा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना पडत आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना, प्रत्येक फोन, लिंक यांची खातरजमा करणे तितकेच महत्वाची आहे. दरम्यान, तक्रारदाराने एजंट अबू अलीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तक्रारदाराने वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -