Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीनारायण राणे यांना नोटीस देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा : देवेंद्र फडणवीस

नारायण राणे यांना नोटीस देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा : देवेंद्र फडणवीस

मुंबई  : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावले हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ही नोटीस पाठविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवले आहे का? असा सवाल करत, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला साक्षीसाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही, त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते, हे नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. फडणवीस यांनी ही माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

फडणवीस म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसतेय. राणेंना सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरलेत की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलावताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. म्हणून आता ज्या अधिकाऱ्याने हे केलेय, त्याच्यावर आयपीसी १६६ए अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान असे न केल्यास भाजप सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल, तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आले असेल, तर त्यांना सुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्यात यावे, अशीही आपण मागणी करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -