Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीDiwali Abhyangasnan : घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत...

Diwali Abhyangasnan : घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत…

दिवाळीला (Diwali Festival) सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरोघरी फराळाचा आस्वाद घेतला जातोय तर प्रत्येक घराबाहेर रांगोळ्या, कंदील सजले आहेत. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानाला (Diwali Abhyangasnan) विशेष महत्त्व आहे. नरकचतुर्दशीच्या (Narakchaturdashi) दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. पण केवळ दिवाळीच नव्हे तर रोजच उटण्याने आंघोळ करणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते, असे आयुर्वेद सांगते. परंतु, उटणं बाजारात विशेषतः दिवाळीच्या दिवसांतच विक्रीसाठी उपलब्ध होतं, अन्यथा त्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे आजच्या लेखात आपण हे उटणं घरीच कसं बनवायचं हे जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदिक पध्दतीने उटणे कसे तयार करावे?

उटण्यामध्ये सहसा बेसनाचे पीठ, चंदन पावडर, दुध किंवा गुलाबजल वापरतात. उटण्यामध्ये बेसनाचे पीठ शरीरावरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडरमध्ये कित्येक आयुर्वेदिक गुण आहेत. तिचा उटण्यामध्ये वापर केल्यास त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाते. उटण्यामध्ये दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील काळे डाग दूर होतात आणि चमकही वाढते.

उटणे तयार करण्यासाठी मसूर डाळ पीठ आणि सुगंधी काचोरा प्रत्येकी १०० ग्रॅम घ्यावे. त्यात गुलाब चूर्ण, गुळवेल चूर्ण, जेष्ठमध चूर्ण, चंदन चूर्ण, हळद चूर्ण, कमळ चूर्ण प्रत्येकी ५० ग्रॅम मिसळावे. सर्व चुर्ण वस्त्रगाळ करुन घ्यावीत की झाले उटणे तयार. उटणे वापरण्यासाठी त्यात दूध किंवा तेल टाकून मिश्रण तयार करावे. उटणे अंगाला लावण्याआधी तेलाने मालिश करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -