Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीMilind Deora : काँग्रेसचे खास नेते मिलिंद देवरा देणार एकनाथ शिंदेंना साथ?

Milind Deora : काँग्रेसचे खास नेते मिलिंद देवरा देणार एकनाथ शिंदेंना साथ?

ठाकरे गट ठरला देवरांच्या नाराजीला कारणीभूत

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असताना आता महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का मिळणार आहे. तर महायुती (Mahayuti) अधिक भक्कम होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसमधून (Congress) खासदार राहिलेले मिलिंद देवरा (Milind Deora) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ देणार आहेत. आजच वर्षा बंगल्यावर ते शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. देवरा यांच्या नाराजीला ठाकरे गट कारणीभूत ठरला आहे.

मुंबईतील १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आजच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा सकाळी ११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका माध्यमांसोर स्पष्ट करतील. त्यानंतर वर्षा बंगल्यावर २ वाजता ते प्रवेशाकरता जातील, अशी चर्चा आहे.

काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गट व काँग्रेसमध्ये दक्षिम मुंबईच्या मतदारसंघाबाबत धुसफूस असल्याचे दिसून आले. खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी गेले असता ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दक्षिण मुंबईवर आपला प्रबळ दावा केला. मात्र तेव्हाच ‘ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी ठरणार नाही. तेव्हा कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत’, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी दिला. यावरुनच महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पेच निर्माण होणार आहे, हे स्पष्ट झाले होते. याच नाराजीतून आता मिलिंद देवरा मविआची साथ सोडून महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -