Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीकाँग्रेस नेते आणि बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपात प्रवेश

काँग्रेस नेते आणि बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला.

नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विजेंदर सिंग यांनी पक्षात प्रवेश केला.

त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्याकडून पराभव झाला.

पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना विजेंदर म्हणाले की, “मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जगभरातील खेळाडूंना ज्या प्रकारचा आदर मिळत आहे, ते कौतुकास्पद आहे. मी देशाच्या हितासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला अधिकाधिक लोकांना मदत करायची आहे,” असे सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर सांगितले.

२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील ३८ वर्षीय मुष्टियोद्धा हा यश मिळवणारा पहिला भारतीय बॉक्सर होता. २००९ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने कांस्य, तसेच २००६ आणि २०१४ कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. तसेच विजेंदर सिंहच्या येण्याने पक्ष आणखीन मजबूत होईल, असा विश्वास विनोद तावडे व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -