Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकमध्ये सिटीबसचा प्रवास महागला

नाशिकमध्ये सिटीबसचा प्रवास महागला

पाच टक्क्यांची वाढ

नाशिक  : नाशिककरांसाठी अतिशय सुखदायी सेवा देणाऱ्या सिटीबसचा प्रवास नवीन वर्षात महाग झाला आहे. महापालिका प्रशासनाने बसभाड्यात पाच टक्क्यांची वाढ केली आहे. नाशिक महानगर परिवहन लिमिटेड कंपनीने दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीचे धोरण यापूर्वीच मंजूर केले आहे. त्यानुसार ही वाढ केल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

सिटीलिंक बससेवेची ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात २५० बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या ४२ मार्गांवर १४८ बस धावतात. दिवसाकाठचे उत्पन्न तब्बल १० लाख रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या या बस सेवेला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. या बससेवेने आतापर्यंत ९ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र, या सेवेवर १८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तूर्तास तरी महापालिका ९ कोटींनी तोट्यात आहे.

सिटीलिकंतर्फे नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जातात. महापालिकेने नुकताच एक ठराव घेतला आहे. त्यानुसार आता दृष्टीहीन बांधवांना मोफत प्रवासाची सुविधा या बसमधून देण्यात येणार आहे. ३ हजार 178 विद्यार्थ्यांनी या बसचा पास काढला आहे. बसच्या एक दिवसीय पासचा लाभ ४५ हजार ४८२ जणांनी घेतला आहे. साप्ताहिक पास ११९ आणि मासिक पासचा लाभ १९४ प्रवाशांनी घेतला आहे. त्रैमासिक पासचा लाभ १२ प्रवाशांनी घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -