Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीBJP advertisement : हाहाहा! 'नाम बदलने से काम नहीं बदलता'... भाजपने जाहिरातीद्वारे...

BJP advertisement : हाहाहा! ‘नाम बदलने से काम नहीं बदलता’… भाजपने जाहिरातीद्वारे उडवली विरोधकांची खिल्ली!

पाहा विरोधकांच्या आघाडीवरील भाजपची ‘ही’ खोचक जाहिरात!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी (Opposition parties) भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी जोर लावला आहे. आपल्या आघाडीचे नाव बदलून त्यांनी ते यूपीए (UPA) ऐवजी इंडिया (I.N.D.I.A.) असेही केले आहे. या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) अनेक भाजप नेत्यांनी टीकास्त्र उपसले. मोदींनी तर हे इंडिया नव्हे तर घमंडिया आहे, असा टोलाही लगावला. यानंतर आता भाजपच्या एका जाहिरातीने (BJP advertisement) सर्वांचे लक्ष वेधले आहे. केवळ नाव बदलून काही होत नाही तर त्यासाठी कामही तसे असावे लागते, अशी एक खोचक जाहिरात भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपाचे प्रवक्ते अमित मालवीय यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी ही जाहिरात ट्वीट केली आहे.

या जाहिरातीत आपल्याला सुरुवातीला शाळेतील एक वर्ग दिसतो. त्यात एक शिक्षिका दिसतात, ज्या गजोधर नावाच्या मुलाला गृहपाठाची वही न आणल्यामुळे ओरडतात. यावर गजोधर ‘मॅम मेरी नोटबुक कुत्तेने खाली’ असं म्हणतो आणि त्यावर सगळी मुलं हसू लागतात. मॅडम आणखी चिडून म्हणतात, ‘ए गजोधर चुप बेशरम, झूठ बोलनेमें शर्म नहीं आती?’. हा गजोधर नावाचा मुलगा वयानेही वर्गातील इतर मुलांपेक्षा मोठा दिसतो.

दुसर्‍या प्रसंगात गजोधरला १०० पैकी ० मार्क मिळतात आणि मुलं त्याला ‘गली गली में शोर है, गधोहर का स्कोअर झिरो है’ असं चिडवत असतात. त्यानंतर हा मुलगा आईकडे येतो. आई विचारते परत शून्य मार्क? त्यावर हा मुलगा म्हणतो सब मुझे गधोहर चिढाते हैं. आप प्लीज कुछ करो. त्यावर आई म्हणते, तुम्हाला नाम बदलते हैं. नया नाम नयी पहचान. मग नाव पुकारलं जातं इंदरसिंग.. हे नाव पुकारल्यावर तोच मुलगा चालत येतो. त्याला १०० पैकी १०० मार्क मिळालेले असतात. त्यावर तो मुलगा खुश होतो आणि तेवढ्यात त्याचं स्वप्न मोडतं. पुन्हा वर्गातील सगळी मुलं त्याच्यावर हसू लागतात. ‘गजोधर हो या इंदर… नाम बदलनेसे काम नहीं बदलता! अपनी हरकते ठिक करो पहले’ असं सर त्या मुलाला ओरडतात. त्यानंतर या व्हिडीओच्या शेवटी ओळी येतात, ‘कृपया ध्यान दे, इस व्हिडीओ का UPA किंवा I.N.D.I.A. से कोई संबंध नहीं है’.

या व्हिडीओत गजोधर म्हणून दाखवण्यात आलेला मुलगा अगदी राहुल गांधींसारखेच हातवारे करतानाही दिसतो. शिवाय इंदर सिंग या नामकरणानंतर जेव्हा तो वर्गात प्रवेश करतो तेव्हा मुलं टाळ्या वाजवत असताना त्याने उंचावलेला ‘हात’ खास शॉटद्वारे दाखवला आहे. यामुळे भाजपने ही काँग्रेसची सरळसरळ खिल्ली उडवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -