Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीAjit Pawar: बारामतीचा उमेदवार बदलणार? अजित पवारांंनी दिलं स्पष्टीकरण...

Ajit Pawar: बारामतीचा उमेदवार बदलणार? अजित पवारांंनी दिलं स्पष्टीकरण…

जानकरांना पाठिंबा दिलाय ही विरोधकांनी पसरवलेली अफवा

पुणे: रासपचे नेते महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना अजित पवार गट पाठिंबा देणार, बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता स्वतः अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीने महादेव जानकरांना पाठिंबा दिला ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचे सांगत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार, असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सांगितलं.

बारामतीचा उमेदवार बदलणार नाही
राज्यातील महायुतीच्या जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा , धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार. महादेव जानकर यांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार, ही केवळ अफवा असून ती विरोधकांनी पसरवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही.

रायगडमधून सुनील तटकरे लढणार
अजित पवार म्हणाले की, तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण केले आहे. २८ तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत.

विजय शिवतारेंचे निर्णय एकनाथ शिंदे घेणार
बारामतीमधून विजय शिवतारे यांनी लोकसभेला लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर टीकाही केली. त्यावर बोलताना विजय शिवतारेंचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे अजित पवारांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या आमदारांसोबत आणखी पाच ते सहा जणांची टीम असेल. निवडणुकीचे प्रचार नियोजन कसे असावे हे ठरवण्यात आले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

बारामतीमध्ये तुमच्या मनातला उमेदवार
कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. बारामतीचा उमेदवार २८ तारखेला जागा जाहीर करतो. तुमच्या मनात जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल. सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे याच हेतूने आम्ही सध्या काम करत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -