Wednesday, May 8, 2024
HomeदेशFake Currency : २००० वर बंदी, मात्र ५०० रुपयाच्या नोटांनी उडवली आरबीआयची...

Fake Currency : २००० वर बंदी, मात्र ५०० रुपयाच्या नोटांनी उडवली आरबीआयची झोप!

मुंबई : २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला असला तरी ५०० रुपयाच्या नोटांनी (Fake Currency) मात्र आरबीआयची झोप उडवली आहे.

२००० रुपयांच्या नोटेवर बंदी घालून त्यांच्या परतीची प्रक्रियाही देशातील सर्व बँकांमध्ये सुरू झाली आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली ३० सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच ५०० रुपयांच्या नोटांशी संबंधित (Fake Currency) मोठी अडचण रिझर्व्ह बँकेसमोर आली आहे.

आरबीआयच्या अहवालानुसार, २ हजाराच्या नव्हे तर ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण (Fake Currency) मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यामुळे आता बाजारातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आरबीआयसमोर आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या सुमारे ९१ हजार ११० बनावट नोटा (Fake Currency) पकडण्यात आल्या. वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत याचे प्रमाण १४.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०२०-२१ मध्ये ५०० रुपयांच्या ३९,४५३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर २०२१-२२ मध्ये ७६ हजार ६६९ किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.

५०० रुपयांप्रमाणे २००० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) आढळल्या आहेत. मात्र, २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घटले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २८ टक्क्यांनी घटून ९ हजार ८०६ नोटांवर आली आहे.

५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांशिवाय १००, ५०, २०, १० रुपयांच्या बनावट नोटाही (Fake Currency) पकडण्यात आल्या आहेत.

आरबीआयच्या अहवालानुसार, यावर्षी एकूण २ लाख २५ हजार ७६९ बनावट नोटा (Fake Currency) पकडल्या गेल्या होत्या, तर गेल्या वर्षी २ लाख ३० हजार ९७१ च्या बनावट नोटा सापडल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -