Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीAyodhya Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, राम मंदिर जनतेसाठी...

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुले होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी जाहीर केली आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले केले जातील, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.

मिश्रा पुढे म्हणाले की, अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावर सोन्याचे कोरीव काम असणार आहे. तसेच मंदिराचा १६१ फुटांच्या कळसालाही सोन्याचे आच्छादन असेल.

मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार

अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तळ मजल्यावरील पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहेत. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवांच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व कामे ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,

Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -