Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीShaniwar Wada : शनिवार वाड्यासमोरील दर्ग्यावरून वाद

Shaniwar Wada : शनिवार वाड्यासमोरील दर्ग्यावरून वाद

दर्गा हटवण्याची मागणी

पुणे : प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. आता, पुण्यात शनिवार वाडा परिसरातील दर्गा (Shaniwar Wada Dargah) हटवा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवावा अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांच्या या मागणीनंतर आता नवा वाद उभा राहिला आहे. शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजा (दिल्ली दरवाजा) जवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागला आहे. शनिवार वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणे शक्य पण नाही. हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण ३० वर्षां पूर्वीच टाईल्सचे काम दिसत आहे, असा दावा दवे यांनी केला आहे.

सदर वाडा हा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येत असल्याने ते अशा कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किंवा देऊ शकतील अशी शक्यता नाही. यामुळे हा दर्गा सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्याला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्याच्या वास्तूचे महत्वसुद्धा कमी होऊ शकते, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

आम्ही सदरचे निवेदन पुरातत्व खाते आणि अतिक्रमण खात्याला दिले आहे. तसेच सैयद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाले यांची का नाही ? असा सवाल देखील दवे यांनी केला आहे. दुसरीकडे, १२३३ साली असा कोणी पीर बाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवार वाडा भूमी पूजापासून ते वास्तू आणि इथल्या प्रत्येक घटनेचा इतिहास उपलब्ध आहे. यात कोठेही या दरग्याचा उल्लेख दिसत नाही, असा दावा देखील दवे यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात आता या दर्ग्यावरून एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा – विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -