Thursday, May 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजचीनमध्ये पुन्हा हाहा:कार! कोरोनासारख्याच आजाराचा उद्रेक, रुग्णालये हाऊसफुल्ल! शाळांना सुट्टी

चीनमध्ये पुन्हा हाहा:कार! कोरोनासारख्याच आजाराचा उद्रेक, रुग्णालये हाऊसफुल्ल! शाळांना सुट्टी

बीजिंग : कोरोनाच्या (Corona) उद्रेकानंतर चीनमध्ये (China) पुन्हा एकदा एका रहस्यमयी आजाराने धूमाकूळ घातल्याने संपूर्ण जगात पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे. चीनमधील अनेक लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखा आजार पसरला आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी रुग्णालयांमध्ये अनेक आजारी लहान मुलं दाखल झाली असून या सर्व मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी १२ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, कोविड, मायकोप्लाझ्मा, न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे.

दरम्यान, या आजाराचा संसर्ग झालेल्या लहान मुलांच्या कुटुंबीयांच्या वतीने एका चिनी वृत्तवाहिनीने सांगितले आहे की, या आजाराची कोणतीही नवी लक्षणं नाहीत, परंतु, मुलांना सतत ताप येतोय आणि त्यांच्या फुफ्फुसांत गाठी तयार होत आहेत. लहान मुलांच्या उपचारासाठी चीनच्या रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. बेडही शिल्लक नाहीत.

चायना डेलीमधील एका अहवालात म्हटले आहे की, “चीनमध्ये श्वसनासंबंधित आजारांनी डोकं वर काढलं आहे. या रहस्यमयी आजाराचा संसर्ग लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे. काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे चीनमधील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -