Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीपन्हाळगडावर दारुपार्टी'च्या व्हिडीओ नंतर हजारो शिवभक्त गडाच्या सुरक्षेसाठी एकवटले

पन्हाळगडावर दारुपार्टी’च्या व्हिडीओ नंतर हजारो शिवभक्त गडाच्या सुरक्षेसाठी एकवटले

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी रंगल्याची घटना समोर आली. या पार्टीचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

किल्ले पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये काही महिला देखील असल्याचे दिसून आले.

याघटनेमुळे राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील शिवभक्तांनी पन्हाळगडावर एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करताना तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राज्यात होत असलेल्या किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -