Tuesday, May 7, 2024
Homeअध्यात्मआले साई भोजनी मुंबई

आले साई भोजनी मुंबई

  • साईश्रद्धा: विलास खानोलकर

आण्णासाहेब दाभोलकरांना साईंनी स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, ”आज दुपारी मी तुझ्या घरी भोजनास येत आहे.” या स्वप्न दृष्टांताने आण्णासाहेबांना अतिशय आनंद झाला. त्यांनी हे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले व म्हणाले, ”आज होळी पौर्णिमा आहे आणि श्रीबाबा जेवायला येणार आहेत. तेव्हा जास्तीचा स्वयंपाक कर.” ती म्हणाली, ”श्रीबाबा शिर्डी सोडून आपल्या घरी कसे येतील?” त्यावर आण्णासाहेब म्हणाले, ”तू शंका घेऊ नकोस. बाबा बोलले आहेत, त्याअर्थी ते कोणत्याही रूपात येतील आणि जेवून जातील. आपल्या घरी स्वयंपाक तयार असलेला बरा.” त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने सर्व स्वयंपाक तयार केला आणि ते दाम्पत्य श्रीबाबांची वाट पाहू लागले. नंतर घरातील मंडळी भोजनास बसली आहेत, तोच बाहेरून आलेला फकीर म्हणाला, ‘तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमच्यासाठी ही एक वस्तू आणली आहे, तिचा स्वीकार करा आणि मला निरोप द्या. याविषयी मी तुमच्याशी केव्हातरी सविस्तर बोलीन.’

त्यानंतर त्याने वर्तमानपत्राचे आवरण बाजूला करून श्रीसाईबाबांची एक सुंदर तसबीर त्यांच्या हातात दिली. ती पाहून आण्णासाहेबांना अतिशय आनंद झाला. त्यांनी विचारले, ”श्रीबाबांची ही तसबीर तुम्ही कोठून आणलीत?” तो म्हणाला, ‘ही तसबीर एका दुकानातून विकत आणलेली आहे. पण त्याविषयी सांगू लागलो, तर तुम्ही सर्वांना भोजनास विलंब होईल. तरी कृपा करून आम्हाला निरोप द्या.’ आण्णासाहेबांनी त्या दोघांचे आभार मानले. ते दोघे निघून गेल्यावर आण्णासाहेबांनी श्रीबाबांची तसबीर त्यांच्यासाठीच मांडलेल्या आसनावर ठेवून तिची पूजा केली आणि नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर सर्व मंडळीचे भोजन झाले. अशारीतीने साईंनी भक्ताची इच्छा पूर्ण केली.

साई दाभोलकरांच्या स्वप्नी
आपले पुण्य आपले करनी।।
भक्तच पुण्याचा खरा जननी
पण साईचे नाम कानोकानी।।
उद्या येईनी मी भोजनी
साई नाम पुण्याच्या खाणी।।
अचानक साई अवतरले फोटोतूनी
शिर्डी-मुंबई अंतर तोडूनी।।
भक्तासाठी साई करी जीवप्राण
साईनाथही भक्तांसाठी जीवप्राण।।
साईउदी सातजन्म पंचप्राण
साईनाम ने १०० वर्षे जगेल पंचप्राण।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -