Wednesday, May 1, 2024
Homeमहत्वाची बातमीडॉ. प्रकाश आमटेंना कर्करोगाचे निदान

डॉ. प्रकाश आमटेंना कर्करोगाचे निदान

पुणे (हिं.स.) : सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे हेअरी सेल ल्युकेमियाने (ब्लड कॅन्सर) ग्रसित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. डॉ. आमटे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपाचररत असून गेल्या १० दिवसांपासून त्यांना न्युमोनियाची लागण झाली आहे.

डॉ. प्रकाश आमटे डिसेंबर १९७३ पासून पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी प्रकल्प चालवतात. तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. डॉ. आमटेंना २००२ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. तर २००८ मध्ये त्यांना पत्नी मंदाकिनी यांच्यासहन रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रकाशवाटा, रानमित्र यासारख्या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

आमटेंना कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर समाजात हुरहुर पसरली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांचे सुपुत्र अनिकेत आमटे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी कुणीही फोन करून फार चौकशी करू नये असे आवाहन केले आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. प्रकाश आमटेंना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवन कार्यावर ‘डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हिरो’या नावाचा २०१४ मध्ये चित्रपट निघाला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटेंची भूमिका साकारली आहे. तर सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान आणि २०० आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -