मुंबई : मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पातील OHE (Overhead Equipment) यंत्रणेसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीच्या परवानगीचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या अतिरिक्त उंचीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) पाठपुरावा करत असून, AAIच्या अंतिम तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे.
मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पासाठी SYSTRA-CEG-SMCIPL यांची जनरल कन्सल्टंट/इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे डिझाइन तयार करण्यासोबतच विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादा आणि आवश्यक परवानग्यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.
मात्र, OHE यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त उंचीचा पुरेसा विचार डिझाइन आणि नियोजनाच्या योग्य टप्प्यावर करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या अतिरिक्त उंचीच्या मंजुरीसाठी MMRDAकडून AAIशी समन्वय साधला जात आहे.
- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे मुंबई : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शरद पवारांच्या कन्या ...
AAIकडून या ठिकाणी किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये काही बदल आवश्यक आहेत का, याबाबत अंतिम तांत्रिक अहवाल आणि पुष्टीकरण अपेक्षित आहे.
AAIचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर MMRDAकडून त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळे मेट्रो मार्गिका ७ अच्या संबंधित कामांबाबतचा पुढील निर्णय AAIच्या तांत्रिक मंजुरीवर अवलंबून राहणार आहे.






