Thursday, August 27, 2026

Nashik : पत्नी अन् वडिलांना 'तो' शेवटचा मेसेज केला अन् तरुणानं आयुष्य संपवलं , नेमकं काय घडलं ?

Nashik : पत्नी अन् वडिलांना 'तो' शेवटचा मेसेज केला अन् तरुणानं आयुष्य संपवलं , नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : नाशिकच्या पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर 'सॉरी' असा मेसेज पाठवून गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव असून तो नाशिकच्या पेठरोड परिसरातील (Nashik Crime News) समर्थनगर येथे राहत होता. बुधवारी (26 ऑगस्ट) रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेनं शुभम मारुती पवारच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. (Nashik News)

'सॉरी' मेसेज पाठवला अन्...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत शुभम पवार हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने अज्ञात कारणावरून गोदा पार्कजवळील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली. नदीत उडी मारण्यापूर्वी शुभमने आपल्या पत्नीला आणि वडिलांना मोबाईलवर 'सॉरी' असा मेसेज पाठवला होता. बुधवारी दुपारी गोदा पार्कजवळ गोदावरी नदीच्या पात्रात स्थानिक नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला त्यावेळी नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.(Nashik News)

घटनेचे गांभीर्य ओळखून पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchavati Police Station) पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मृतदेह शुभम पवार याचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान शुभमचा आतेभाऊ निलेश नंदू गुंजाळ यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे मॅडम यांनी तपासून शुभम मारुती पवार यास मृत घोषित केले. या घटनेनं शुभम पवारच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik News)

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

शुभमने ऐन तारुण्यात एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्देवी घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार संदीप बाविस्कर या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >