Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथे महिला आणि तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस शिपाई अनिल तायडे याने अखेर यावल पोलीस ठाण्यात (Yaval Police Station) हजर होऊन आत्मसमर्पण केले आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने पोलिसांसमोर हजेरी लावली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पूरक दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
Nashik Rain Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे पावसाच्या सरी पडण्याची शक्यता ...
नेमकं प्रकरण काय ?
या प्रकरणातील फिर्यादी विजया तायडे (६०) आणि आरोपी एकाच समाजातील असून, ते परस्परांचे नातेवाईक आहेत. पोलीस शिपाई अनिल तायडे याच्या पत्नीचा आणि फिर्यादीचा ग्रामसभा सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्यातूनच २८ मार्च २०२६ रोजी वाद विकोपाला गेला. घटनेच्या दिवशी अनिल तायडे याने सार्वजनिक ठिकाणी फिर्यादी विजया तायडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यासह त्यांची मुलगी आरती हिला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आरती हिच्या डोक्याला लोखंडी रॉडने गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात अनिल तायडे याच्यासह सागर तायडे व माया तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले तरी नाशिकची गुन्हेगारी 'जैसे थेच' ...
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर ३० जुलै रोजी अन्य आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी पोलीस शिपाई अनिल तायडे याला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९३ अन्वये पूरक दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अनिल तायडे हा फरार होता. दरम्यानच्या वेळेत अनिल तायडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. २३ ऑगस्ट रोजी न्यायालयाने गुन्ह्यातील त्याचा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्याचा जामीन अर्ज फेटाळला .
Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) मोहिमेच्या नवव्या ...
यावल पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
त्यानंतर अनिल तायडे याने स्वतः यावल पोलीस ठाण्यात हजर (Yaval Police Station) होत आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सोबतच ३१ मार्च २०२६ रोजी निलंबितही करण्यात आले आहे, त्याच दिवशी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीचा अहवाल २८ जून २०२६ रोजी सादर करण्यात आला असून त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी अनिल तायडे याची दोन वर्षांची वेतनवाढ सुद्धा रोखण्यात आल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.




