पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली पडलेल्या 25 वर्षीय तरुणीचा शेजारून जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे 10 वाजता हॉटेल ब्रह्मासमोर घडली. (Pune Accident)
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय महिलेची पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ...
मृत तरुणीचे नाव कंचन खड्डा (वय 25) असून ती मूळची राजस्थानची रहिवासी असल्याची माहिती आहे.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल बस खानापूरच्या दिशेने स्वारगेटकडे जात होती. हॉटेल ब्रह्मासमोर बस आली असता, पुढील दरवाजाजवळ उभी असलेली कंचन अचानक खाली रस्त्यावर पडली. त्याचवेळी बसच्या शेजारून स्कूल बस जात होती. कंचन रस्त्यावर पडताच ती स्कूल बसच्या मागील उजव्या चाकाखाली आली. (PMPML)
पुण्यात धावत्या बसमधून तरुणी खाली पडली; स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
चाक डोक्यावरून गेल्याने कंचनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून रस्त्यावरील नागरिक आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्कूल बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, तरुणी नेमकी कोणत्या कारणामुळे पीएमपीएमएल बसमधून खाली पडली, बसचा दरवाजा उघडा होता का, तसेच बसला अचानक ब्रेक लागला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. (Accident news)






