Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले तरी नाशिकची गुन्हेगारी 'जैसे थेच' असल्याचं चित्र आहे, हे गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या घटनांतून स्पष्ट दिसत आहे. आता पुन्हा एकदा नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ पहायला मिळाला आहे. शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रविवार कारंजा (Ravivar Karanja) परिसरातील चांदीचा गणपती मंदिरासमोर शनिवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास टवाळखोरांनी प्रवाशांना सोडून घरी परतणाऱ्या एका ५६ वर्षीय रिक्षाचालकाला विनाकारण अडवून, शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (Nashik Crime News)
Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७ वर्षीय युवकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू ...
रिक्षाचालक गंभीर जखमी
धक्कादायक म्हणजे एवढ्यावरच न थांबता या टवाळखोरांनी दगड उचलून चालकाच्या पाठीवर आणि कानाखाली मारून गंभीर दुखापत केली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा मद्यधुंद व टवाळखोर तरुणांच्या गुंडगिरीचा प्रश्न समाेर आला आहे. इंदिरानगर (Indiranagar) येथील रहिवासी अल्ताफ मेहबूब खान (वय ५६) यांच्यासोबत हा सर्व थरार घडला आहे. अल्ताफ मेहबूब खान हे ऑटो रिक्षाने प्रवाशांना रविवार कारंजा (Ravivar Karanja) येथे सोडून घरी परतत होते. यावेळी 'चांदीचा गणपती' मंदिरासमोरील ('Chandicha Ganesha' Temple) मुख्य रस्त्यावर आले असता, एका दुचाकीवरून (क्रमांक MH 15 KT 9649) आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांची रिक्षा अडवली. रिक्षाचालकाने वाद टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र, संशयितांनी पुन्हा रिक्षासमोर येत त्यांना खाली उतरवले आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. (Nashik Crime News)
Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) मोहिमेच्या नवव्या ...
सरकारवाडा वाडा पोलिसांत गुन्हा
यातील एका उंच, सडपातळ बांध्याच्या व राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून खान यांच्या पाठीवर जोरदार वार केला. तसेच डाव्या कानाच्या खाली मारहाण करून त्यांना गंभीर (Injured) जखमी केले. घटनेनंतर जखमी रिक्षाचालक अल्ताफ खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) धाव घेऊन तक्रार नोंदवली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित वापरत असलेल्या दुचाकीच्या (MH 15 KT 9649) नंबरवरून पोलीस माग काढत आहेत. हवालदार बागुल (Sarkarwada Police Station) तपास करत आहेत.





