छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्थानिक मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुकानातून आणलेल्या पाचही कचोऱ्यांमध्ये हा घाणेरडा प्रकार समोर आला.
मुलांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह
एका ग्राहकाने आपल्या मुलांसाठी मिठाईच्या दुकानातून ५ कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. दुर्दैवाने, कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या मिसळल्या असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच मुलांनी दोन कचोऱ्या खाऊन टाकल्या होत्या. उरलेल्या कचोऱ्या उघडल्यानंतर हा अत्यंत घाणेरडा प्रकार उघडकीस आला. ग्राहकाने या घटनेचा जाब विचारण्यासाठी दुकान गाठले असता, व्यापाऱ्यांनी आपली चूक मान्य करत ते पार्सल फेकून देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. ग्राहकाकडे ऑनलाईन व्यवहाराची पावती उपलब्ध असून त्यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला ...
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे दुकानदारांचे धाबे दणाणले
सध्या अन्न व औषध प्रशासनाची धुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर रोज धाडी टाकल्या जात आहेत. मोठ्या ब्रँड्सपासून ते स्थानिक दुकानांपर्यंत कुणाचीही गय न करता परवाने रद्द करण्याचे सत्र सुरू आहे. अशा परिस्थितीत वैजापूरमधील या गंभीर घटनेनंतर एफडीए प्रशासन सदर मिठाईच्या दुकानावर काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्ध 'बुधा हलवाई'च्या मिठाईचे दर वाढले
साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा थेट फटका आता खाद्यप्रेमींच्या खिशाला बसणार आहे. नाशिकमधील अत्यंत नामांकित 'बुधा हलवाई' या मिठाईच्या दुकाने आपल्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. साखरेचे भाव वाढल्याने उत्पादनाचा खर्च वाढल्याचे सांगत संचालकांनी मिठाईच्या दरात प्रति किलो ४० रुपयांची भर घातली आहे. यामुळे आतापर्यंत ३२० रुपये प्रति किलो मिळणारी प्रसिद्ध जिलेबी आता ३६० रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. सणासुदीचे दिवस जवळ आले असतानाच नाशिककरांना या भाववाढीमुळे आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.






