Monday, August 24, 2026

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७ वर्षीय युवकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने हा २७ वर्षीय दिपक गवजीराम चोरमलेचा (Deepak Gavjiram Chormale) जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बळी मंदिरासमोर घडली. चोरमले यांचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. संसाराची स्वप्ने रंगविण्याच्या काळातच काळाने घातलेल्या घावाने चोरमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं ?

रविवारी दुपारी दुचाकीवरून आडगावकडून नाशिकच्या दिशेने दिपक चोरमले (रा. जेऊर, पो. वाखरी, ता. मालेगाव) हे जात होते. बळी मंदिरासमोर आले असता ब्रिजच्या दिशेने चुकीच्या बाजूने आलेल्या पिकअपने (एमएच १२ डब्ल्यूएक्स ९३५४) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दिपक यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर स्थानिक नागरिक संतोष झाडगे यांनी तत्काळ धाव घेत गंभीर जखमी दिपक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावीत यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. (Nashik Accident News)

दिपक यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने उराशी बाळगून जीवनाची वाटचाल सुरू असतानाच झालेल्या या अपघाताने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. दिपक यांच्या निधनाची वार्ता जेऊर गावात पोहोचताच शोककळा पसरली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा