Friday, July 17, 2026

Corona Alert : देशामध्ये कोरोनाचे ३३९ रुग्ण; केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूत आरोग्य विभाग सतर्क

Corona Alert : देशामध्ये कोरोनाचे ३३९ रुग्ण; केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूत आरोग्य विभाग सतर्क

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत अंदाजे ३३९ रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ११५ रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल कर्नाटकात ६४, महाराष्ट्रात ४३ आणि तामिळनाडूमध्ये ३९ रुग्ण आहेत.आंध्र प्रदेशात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. राज्यात कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी चार संक्रमित व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव जी. वीरपांडियन यांनी सांगितले. ही प्रकरणे २६ जून ते १६ जुलै दरम्यान समोर आल्याचेही जी. वीरपांडियन यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे.(Corona Alert )

जी. वीरपांडियन यांनी निवेदनात सांगितले की, ‘मृतांमध्ये वायएसआर कडप्पा जिल्ह्यातील तीन आणि काकीनाडा जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सर्व मृतांना गंभीर आरोग्य समस्या होत्या. विषाणूच्या जेनेटिक सीक्वेंसच्या ओळखीसाठी पाच नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत’. जी. वीरपांडियन यांच्या म्हणण्यानुसार, एकूण १२ प्रकरणांपैकी ८ वायएसआर कडप्पा जिल्ह्यात, दोन गुंटूरमध्ये आणि विशाखापट्टणम व काकीनाडा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवले गेले आहे. त्यांनी सांगितले की, ‘यापैकी दोन प्रकरणे संक्रमित व्यक्तींच्या निकट संपर्कात आलेल्या लोकांशी संबंधित होती.’

आरोग्य विभागाचे सचिव जी. वीरपांडियन यांनी लोकांना घाबरून न जाता, सावधगिरी बाळगण्याचा आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. राज्यातील कोविड-१९ चा पहिला रुग्ण गेल्या महिन्यात २६ जून रोजी कडप्पा जिल्ह्यात आढळला होता. यानंतर, या महिन्यात १ ते १६ जुलै दरम्यान अंदाजे ११ नवीन रुग्ण आढळले. (India)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा