दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कर्नाटक : दक्षिण कन्नड (Kannad) जिल्ह्यातील बीसी रोड बस स्थानकावर २५ वर्षीय तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी बसमधून जबरदस्तीने बाहेर ओढून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी फरार झाला आहे. (karnatak Crime)
मृत महिलेची ओळख काक्केपडवू येथील रहिवासी लावण्या अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लावण्या काम आटोपून बीसी रोडहून काक्केपडवूकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (KSRTC) बसने घरी जात होती. (Murder News)
ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीच्या ...
नेमकं काय घडलं ?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान एक तरुण बसमध्ये चढला. त्याने लावण्याला जबरदस्तीने बसबाहेर ओढले आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने तिच्यावर सलग वार केले. गंभीर जखमी झालेली लावण्या घटनास्थळीच कोसळली. तिला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Koyta Attack)
ही घटना गर्दीच्या बस स्थानकात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. तरुणाने नदीत उडी घेण्यापूर्वी एक ...
प्राथमिक तपासात हा गुन्हा वैयक्तिक वाद किंवा जुन्या वैमनस्यातून घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तपासाच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक डॉ. अरुण कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बंटवाल शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






