बारामती : नीट २०२६ (NEET 2026) परीक्षेत बारामतीच्या श्रावणी कृष्णकांत कुदळे (Shravani Kudale) हिने उल्लेखनीय यश मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवले असून देशभरातील मुलींमध्येही अव्वल स्थान मिळवत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे.
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ...
श्रावणीच्या या यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी श्रावणीचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही ती अशीच यशस्वी वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संवादादरम्यान सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांनी श्रावणीच्या यशामागे योगदान देणाऱ्या शिक्षकांचे आणि कुटुंबीयांचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे (आदिवासी) सर्व लाभ मिळवणाऱ्या व्यक्तींच्या ...
यावेळी त्यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. श्रावणीच्या यशाचा त्यांनाही अभिमान वाटला असता आणि त्यांचे आशीर्वाद तिच्यासोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नीट मध्ये (NEET 2026) मध्ये मिळालेल्या या यशामुळे श्रावणी कुदळेचे राज्यभरातून कौतुक होत असून बारामतीसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.






