मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मानसिक छळ व कौटुंबिक अत्याचाराचे आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Nilam Gorhe) यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांकडे निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अमरावती : अमरावतीतील (Amravati) एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. माजी खासदार झाल्याची वेदना आजही ...
डॉ. गोऱ्हे यांनी गिरीजा राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेतली. यावेळी त्यांनी, "या लढ्यात तुम्ही एकट्या नाही. न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल," असा विश्वास व्यक्त केला. (Maharashtra)
यानंतर त्यांनी गिरीजा राऊत यांच्या वकिलांशीही चर्चा करून प्रकरणातील कायदेशीर बाबी, पुरावे आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या प्रकरणात सरकारी वकील नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. Girija Raut Case
राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना प्राधान्य ३ आरोबी, ४ सबवे व अंडरब्रिजचे ...
डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, महिलेने केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून कोणताही राजकीय किंवा अन्य दबाव न येता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्या कोणालाही कायद्यापासून संरक्षण मिळता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणात शासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. अन्यायाविरोधात महिलांनी निर्भीडपणे पुढे येऊन कायद्याची मदत घ्यावी, असे आवाहन करत वेळेत आवाज उठवल्यास टोकाच्या घटना टाळता येऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.




